किती काळ जनतेची मुस्कटदाबी करणार ? : प्रियांका गांधी


वेब टीम : दिल्ली
कलम ३७० रद्द करण्यावरुन काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी पुन्हा केंद्र सरकारवर हल्ला चढवला आहे.

राहुल गांधींसह विरोधी पक्षाच्या नेत्यांचं शिष्टमंडळ जम्मू-काश्मीरमधील परिस्थितीची पाहणी करण्यासाठी गेले होते. पण त्यांना विमानतळावरुनच माघारी पाठवण्यात आले. या पार्श्वभूमीवर प्रियांका गांधी केंद्राचा निर्णय हा देशविरोधी आहे, असं ट्विटरच्या माध्यमातुन म्हणाल्या आहेत.

काश्मीरमध्ये राष्ट्रवादाच्या नावाखाली सरकारची दडपशाही सुरू आहे. किती काळ सरकार जनतेची मुस्कटदाबी करणार? असा सवालही त्यांनी ट्विटद्वारे केला आहे.

या ट्विटसोबतच त्यांनी विमानातील व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत काश्मीरमधील एक महिला राहुल गांधींकडे आपल्या व्यथा मांडताना दिसत आहे.

Post a Comment

0 Comments